कारले चिप्स

साहित्य:- २ कारले, १ चमचा तेल, मीठ, १/२ चमचा चाट मसाला.
कृती:- कारली बिया काढून स्लाईस करून २ तास मिठाच्या पाण्यात ठेवा. कारली पूर्ण पुसून घ्या.
२०० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा. कारली बास्केट मध्ये घालून त्यात ठेवा. थोडेसे तेल ब्रश करा, ८ मि. एअर फ्राय करा. मग बास्केट बाहेर काढून कारली दुसऱ्या बाजूला उलटी करा थोडेसे तेल ब्रश करा व परत ८ ते ९ मिनिटे एअर फ्राय करा. नंतर बास्केट काढा. मीठ, व चाट मसाला भूरभूरावा.
अश्या प्रकारे आपण भेंडी पण करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*