साहित्य : चपटा मिरचीचे बारीक वाटण २ वाटय़ा, घट्ट दही अर्धी वाटी, भिजवून बारीक वाटलेले अक्रोड १/२ वाटी जायपत्री, तेजपान ३४, स्टारफूल २ नग, आलंलसूण पेस्ट , १/२ चमचा, मीठ चवीनुसार, वनस्पती तूप फोडणीला, शहाजिरे १ चमचा.
कृती : पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply