साहित्य : पाव किलो मैदा, १ मोठा चमचा कसुरी मेथी, २ चमचे तीळ व तेवढाच ओवा हातावर खरडून घ्यावा. आवडीप्रमाणे तिखट-मीठ, तळायला तेल ३ वाट्या, तसेच ७ मोठे चमचे मोहनासाठी तेल
कृती : प्रथम मैदा चाळून घ्यावा. मग तो एका तसराळ्यात ठेवावा. त्यात तेलाचे कडकडीत गरम मोहन घालावे. तसेच तिखट – मीठ, तीळ व ओवा त्यात घालावा. मग मैद्याला हे सर्व तेलासह चांगले चोळावे. कसुरी मेथी चुरून घालावी. आता मैदा पाण्याने अगदी घट्ट भिजवावा व २ तास झाकून ठेवावा. या गोळ्याचे ४ ते ५ सारखे भाग (गोळे) करावेत. १ गोळा घ्यावा व त्याची ओट्यावर (तेल लावून) मोठी पोळी लाटून, लहान वाटीने सारख्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात व मध्यम आचेवर बदामी रंगावर खमंग तळाव्यात. त्या कागदावर टाकाव्यात म्हणजे जास्तीचे तेल कागदाला लागेल. या पुऱ्या खुसखुशीत व चविष्ट लागून १०-१२ दिवस छान राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply