साहित्य : केळफूल निवडून, बारीक चिरून, ४-५ चमचे तेल, १ मोठा बटाटा उकडून, अर्धा गाजर बारीक चिरून, गव्हाचा ब्रेड २ स्लाईस, आले, लसूण, मिरची पेस्ट, धने, जिरे पूड, मीठ.
कृती : चिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे. गोल चपटे कटलेट तव्यावर तेल टाकून खमंग भाजावेत व गरम गरम सर्व्ह करावेत. बरोबर सॉस अथवा हिरवी चटणी छान लागते. चविष्ट , फायबरयुक्त, करण्यास सहज सोपा पदार्थ.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply