साहित्य:-१ वाटी खजुर, १ वाटी गूळ, पाऊण वाटी चिंच, ३ चमचे धने:-जिर्यांची पावडर, चवीला मीठ, आवश्यकतेनुसार साखर, लाल तिखट.
कृती:-खजुर आणि चिंच १ तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजत घातल्यामुळे खजुराच्या बिया सहज निघतील. त्यात गूळ मिसळून हातानेच एकत्र कुस्करावे. मग मिक्सरमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट एका गाळण्यातून गाळून घ्यावी लागेल. कारण मिक्सरमधून वाटून घेतलं तरी चिंचेचे दोरे आणि खजुराची सालं राहतातच. मग गाळलेल्या पेस्टमध्ये धने:-जिर्याघची पावडर व मीठ घालावे. चवीनुसार हवे असल्यास साखर आणि लाल तिखट घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply