साहित्य:- खवा पाव किलो, साखर तीन वाट्या, तांदळाची पिठी पाऊण वाटी, वेलची व जायफळ पूड एक चमचा, कणीक दीड वाटी, मैदा दीड वाटी, दूध एक वाटी, साजूक तूप अर्धा चमचा.
कृती:- साखर मिक्सारवर बारीक करून मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी. तांदळाची पिठी साजूक तुपावर मंद आचेवर भाजून घ्यावी. खवा मोडून तूप सुटेपर्यंत भाजावा. खवा गार झाल्यावर त्यात तांदळाची पिठी व साखर घालून हे सारण मऊ मळावे. मैदा व कणीक मीठ घालून दुधाने (लागले तर पाणी) मऊ भिजवावे. पोळ्या करताना खव्याच्या लिंबाएवढ्या गोळ्या कराव्या. कणकेच्या गोळ्या त्याच्या दुप्पट कराव्यात. कणकेच्या दोन पाऱ्यांमध्ये खव्याची एक पारी घालून हलकेच पातळ पोळ्या लाटाव्या. नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर भाजाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply