आजचा विषय खीर

तांदूळ, रवा, शेवयांची खीर हे आपण पारंपरिक प्रकार नेहमी करतो, पण भोपळा, मका, गहू, मूग पनीर. यांची खीर कधी बनवत नाही, या खीरी चवीला तर त्या छान असतातच, पण पौष्टिकही.
काही कृती खीरीच्या
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पौष्टिक खीर
साहित्य:- १/२ वाटी मोड आलेल्या नाचणीचं पीठ, २ टे.स्पू. गव्हाचा जाड दलिया, २ टे.स्पू. डिंक पावडर, २ टे.स्पू, खारीक पावडर, ४ वाटी दूध, साखरे ऐवजी ४ मोठे चमचे काकवी, वेलची पूड, जायफल पूड, सुक्या मेव्याचे काप आणि २ टे.स्पू साजूक तूप.
कृती:- गव्हाचा दलिया थोड्या तुपात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावा. त्यात अर्धी वाटी पाणी घालून कुकरमधून ३-४ शिट्टय़ा काढाव्यात. थोड्या तुपात नाचणीचं पीठ परतावं. त्यातच डिंक पावडर घालून परतावी. नंतर दूध घालून मंद आचेवर शिजवावी. पाच मिनिटांनी त्यात खारीक पावडर शिजवलेला दलिया, वेलची, जायफळ पूड आणि काकवी घालून ढवळून गॅस बंद करावा. वर ड्रायफ्रूट्सचे काप टाकून खीर गरम किंवा गार सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मोड आलेल्या गव्हाची खीर
साहित्य:- १ वाटी मोड आलेले गहू, बिया काढलेले ८-१0 खजूर, २ टी.स्पू. खसखस, २ टे.स्पू. किसलेलं खोबरं, २ टे.स्पू. हिरवे मोडाचे मूग, दूध गरजेप्रमाणे, वेलची पूड आणि १/२ वाटी गूळ.
कृती:- मोडाचे गहू आणि मूग कुकरमधून शिजून घ्यावेत. खजुराचा मिक्सरवर लगदा तयार करावा. गहू शिजल्यावर त्यात खजुराचा लगदा, खोबरं, बारीक केलेली खसखस आणि वेलची पूड टाकावी.
मिश्रणात दूध टाकावं. मिश्रणाला चांगली उकळी आणावी. शेवटी गॅस बंद करून थोड्या वेळानं किसलेला गूळ घालावा. खिरीत हा गूळ चांगला ढवळून मिसळावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कॉर्न रबडी (बासुंदी)
साहित्य:- १ वाटी स्वीट कॉर्नचं वाटण, १ लिटर दूध, अर्धी वाटी साखर, वेलची-जायफळ पूड आणि केशर काड्या.
कृती:- जाड बुडाच्या कढईत दूध घालून ते निम्मं होईल इतकं आटवावं. नंतर त्यात स्वीट कॉर्न वाटण घालावं. मंद आचेवर ढवळावं. नंतर त्यात वेलची, जायफल पूड आणि केशर काड्या घालून गॅस बंद करून कोमट झाल्यावर साखर घालावी. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दुधी भोपळ्याची खीर
साहित्य:- १ वाटी किसलेला दुधी भोपळा, २ टे. स्पू. भाजलेला बारीक रवा, ३/४ लिटर दूध, १ वाटी साखर, २ टे.स्पू. तूप, वेलची पूड, बदाम आणि पिस्त्याचे काप.
कृती:- किसलेला दुधी तुपावर परतावा. नंतर त्यात रवा घालावा. त्यात दूध साखर घालून हे जिन्नस एकत्र शिजवावं. शिजताना ते घट्ट होतं. आयत्या वेळी दूध घालून ती थोडी पातळ करून घ्यावी. आणि त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

खीराण
साहित्य:- १/२ वाटी उत्तम प्रतीचे तांदूळ, २ टे. स्पू. तूप, १ लिटर दूध, १ वाटी साखर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, केशरकाड्या आणि वेलची पूड.
कृती:- तांदूळ स्वच्छ धुवून तुपावर परतावे. त्यात दूध घालून मंद आचेवर शिजवावे. हे मिश्रण मधूनच ढवळत रहावं. ते निम्मं होईपर्यंत आटवावं. नंतर त्यात साखर, ड्रायफ्रूट्स, केशर आणि वेलची पूड घालून गॅस बंद करावा. खीराण गरम किंवा गार कसंही खायला छान लागतं.
गार झालेल्या खीराणमध्ये आंबा/ अननस/ स्ट्रॉबेरी/ चिकूच्या फोडीही घालता येतात. मात्र फळांच्या फोडी यात घातल्यावर हे खीराण गरम करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

फिरनी
साहित्य:- १/२ वाटी बासमती तांदूळ, १ लिटर दूध, १ वाटी साखर, केशर काड्या, ड्रायफ्रूट्सचे काप, चांदीचे वर्ख.
कृती:- तांदूळ स्वच्छ धुवून थोडे दुधात भिजत घालावे. त्यात केशरही घालावं. नंतर २ तासांनी तांदूळ बारीक वाटावे. जाड पातेल्यात दूध-साखर एकत्र उकडत ठेवून तांदळाची पेस्ट घालावी कस्टर्डप्रमाणे घट्टसर होईपर्यंत मिश्रण सारखं ढवळावं. गॅस बंद करून लहान-लहान बाऊलमध्ये ओतावं. लगेच त्यावर ड्रायफ्रूट्सचे काप घालून वरती थोडा वर्ख लावावा. मिश्रण गार झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावं. मातीच्या वाडग्यांमध्ये सेट केल्यास फिरणीचा वेगळाच वास लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पनीर खीर
साहित्य:- २५0 ग्रॅम पनीर, दोन लिटर दूध, १ वाटी साखर, काजूचे काप, चारोळ्या, केशर आणि वेलची पूड.
कृती:- दूध उकळत ठेवून आटवून निम्मं करावं. त्यात साखर, काजू आणि चारोळी घालावी. पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून त्यात घालावे. एक दोन उकळ्या काढून गॅस बंद करावा. पनीरचे तुकडे तुपात तळून घेऊन खिरीत घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*