साहित्य:- २०-२५ जर्दाळू, १/२ कप साखर, २ कप दूध कस्टर्ड बनवण्यासाठी, ३ मोठे चमचे साखर, ३ चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर.
कृती:- जर्दाळू रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी त्याच पाण्यात शिजवावेत. थंड झाल्यावर जर्दाळूमधील बदाम काढून घ्यावे. जर्दाळूचा शिजवलेला गर व साखर पुन्हा एकत्र एकजीव शिजवून घ्यावा. तो जॅमप्रमाणे होईल. २ कप दूध उकळून त्यात ३ चमचे साखर घालावी व तीन चमचे कस्टर्ड पावडर थोड्या थंड पाण्यात कालवून त्यात मिसळावी. सतत ढवळत राहवे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पळीवाढ घट्ट झाल्यावर थोड्या वेळ कस्टर्ड फ्रीडमध्ये ठेवावे. एका छोट्या बाऊलमध्ये थोडे कस्टर्ड घालून वर २-३ चमचे शिजवलेल्या जर्दाळूचे मिश्रण घालावे. त्यावर जर्दाळूमधून निघालेले अख्खे बदाम ठेवावेत. खुबानी का मीठा व्हॅनिला आईस्क्रीमबरोबरही सर्व्ह करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply