भेळ आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. त्यातून भेळ म्हणजे महिला वर्गाचा वीक पॉईंट.
भेळ,चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. भेळ मध्ये असलेल्या आंबट,गोड, तिखट चटण्यांमुळे त्याची चव काही वेगळीच, नेहमी भेळेत टोमेटो असला तरी कैरीच्या त्याची माझा वेगळीच.
भेळ
साहित्य – कुरमुरे, फरसाण, उकडून बारीक चिरलेला बटाटा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कैरीच्या मोसमात बारीक चिरलेली थोडी कैरी, चिंच:-खजुराची चटणी, लसूण:-मिरचीचा ठेचा (थोड्या तेलावर भरपूर लसूण आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून परतून घ्या. थंड झालं की मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.)
कृती:– वर दिलेलं सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार प्रमाण घेऊन एकत्र करा. छान मिसळून घ्या.
प्लेटमध्ये घ्या. वरून बारीक शेव भुरभुरा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply