साहित्य: एक वाटी उडदाची डाळ, दोन वाट्या कोहळ्याचा कीस, सात – आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा तिखट व चमचा हळद, कोथिंबीर आणि तेल , मीठ चवीनुसार.
कृती: प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुवून ती चार – पाच तास पाण्यात भिजत घालावी . नंतर उपसून ती मिक्सर मध्ये वाटावी . त्या डाळीत कोहळ्याचा कीस घालावा. तसेच मिरच्यांचे तुकडे , तिखट, मीठ आणि हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून पीठ मळावे. नंतर त्या पीठाचे वडे थापावेत व तेल तापवत ठेवून त्यात तळून काढावेत. हे वडे हलके होतात व खावयास चांगले लागतात.
टीप: कोहाळ्याचे वडे प्रमाणे मटकीचे वाडे सुद्धा करता येतात. उडदाच्या डाळीऐवजी मटकी भिजवून वाटून घ्यावी.
Leave a Reply