साहित्य :- कोकम फळे एक किलो, साखर दोन किलो.
कृती :- फळे पिकलेली असावीत. या फळांचे चिरून समान दोन भाग करा. ते वाटीसारख्या आकाराचे होतील. त्यातील बिया काढाव्यात. या कोकम वाट्यात साखर भरा. एक काचेची बसरणी घ्या. त्यात या साखर भरलेल्या कोकम वाट्या साखर सांडणार नाही अशा भरुन घ्या. साखर उरली असल्यास वरून सगळीकडे पसरून घालावी. बरणीला आतून साखर लावलेली असावी. अशा प्रकारे बरणी दोन तीन दिवस ठेवली की फळांचा रस सुटू लागतो. मात्र बरनी उन्हात तापत ठेवू नये.
जेव्हा कोकम सरबत करायचे असेल तेव्हा बरणीतील पाहिजे तेवढा रस काढून घ्या. जरुरी इतके पाणी घाला. चवीसाठी थोडे मीठ घाला. ढवळा, गाळून घ्या. प्यायला द्या.
Leave a Reply