साहित्य: ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
कृती: आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून रस काढा. गाळून घ्या. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की कढीपत्ता आणि हिंग घाला. हवी असल्यास मिरची घाला. त्यावर हे आमसूलाचं पाणी घाला. त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला. उकळा. मीठ-साखर घाला. परत उकळा. पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानं वाढवा.
Leave a Reply