या पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात.
कृती : ५०० ग्रॅम स्वच्छ केलेली कोंबडी तुकडे करून बाजूला ठेवावी. ३ वाटय़ा मालवणी ग्रेव्ही घेऊन त्यात कोंबडीचे तुकडे घालावेत. १/२ वाटी पाणी घालून कोंबडी मऊसर शिजवा. चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालावी.
टीप : आवडत असल्यास थोडे नारळाचे दूध घातले तरी चालेल.
वडय़ांकरिता साहित्य : तांदूळ १ वाटी, उडीद १ वाटी, बारीक कापलेली हिरवी मिरची २ चमचे, ओल्या नारळाचा कीस १/२ वाटी, मीठ चवीनुसार, तळायला तेल
कृती : एक वाटी तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ २ तास पाण्यात भिजवून बारीक दळावी. हे मिश्रण ३ ते ४ तास ठेवल्यानंतर ह्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, चवीला मीठ घालून वडे थापा व त्याच्या मधोमध एक छिद्र पाडा व मंद तळा. छिद्र पाडल्यामुळे वडे चांगले तळले जातात. फार पूर्वी वडय़ाला पाच किंवा सात छिद्रे पाडण्याची पद्घत होती. याला पूर्वी काही ठिकाणी ‘घोसक’ असेसुद्घा संबोधित केले जायचे. असे हे वडे व कोंबडी खाण्याची पद्घत मालवणमध्ये प्रचलित आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply