कोथिंबिरीचे पराठे

साहित्य: कोथिंबिरीच्या २-३ मोठ्या जुड्या, ३-४ वाट्या कणीक, दोन टेबलस्पून बेसन (चणा डाळीचे) पीठ, चवीनुसार निरव्या मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, पेरभर आले, चवीनुसार मीठ, एकचमचा जिरेपूड, पावचमचा हळद, एक टेबलस्पून पांढरे तीळ अथवा खसखस, एक वाटी तेल कींवा वनस्पती तूप, सारणाचा मसाला परतण्यासाथी एक टेबलस्पून तेल.

कृती : प्रथम कोथिंबीर चांगली निवडून, स्वच्छ धुवून, निथळून सूती कपड्याने चांगली कोरडी करून घ्या. आले – लसूण – मिरच्या व पांढरे तीळ अथवा खसखस (भाजून घेऊन) एकत्र वाटून घ्यावे. त्यातचजिरेपूड घालावी. आता थोड्या तेलावर कोथिंबीर चुरचुरीत होईतो परतावी. मग त्यात मिक्सरवर केलेले मसाल्याचे वाटण व चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतावे. बेसन (चणा डाळीचे) पीठ थोड्या तेलावर खमंगभाजून कोथिंबीरीच्या तयार केलेल्या मसाल्यात घालावे. चांगले कालवून हा बाकर – मसाला सारण एका बाऊलमध्ये काढून ठेवा.एका परातीत पराठ्याची कणीक,एक टेबलस्पून तेलाचे मोहन व चवीला मीठ घालून घट्ट पीठ भिजवून दोन तासओल्या सूती कपड्याखाली मुरण्यासाठी झाकून ठेवावे. आता पराठे करतेवेळी लाडवा एव्हढा कणकेचा गोळा घेऊन हाताने द्रोणाचा आकार द्यावा किंवा छोटी पुरी लाटुन्न व त्याचाद्रोण करावा. त्यात सुमारे दोन टेबलस्पून कोथिंबिरीचा बाकर(सारण)भरावा. द्रोणाच्या कडा जुळवून गोल कचोरीसारखी गोळा वळावा.पोळपाटावर कणीक भुरभुरून त्यावर हा गोळा ठेवून हलक्या हाताने पराठे लाटून तेल वा तूप सोडून भाजावे. हे कोथिंबिरीचे पराठे आठवडाभर छान टिकतात.लोणी व पुदिना चटणी सोबत सर्व्ह करावे. खूपच स्वादिष्ट लागतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*