साहित्य:- १ लिटर दूध, ५-६ हिरव्या वेलच्या, दोन थेंब पिवळा रंग, एक मोठा चमचा मध, अर्धा लिंबाचा रस, एक मोठा चमचा साखर, चिरलेला सुकामेवा व रंगीत खडीसाखर सजावटीसाठी.
कृती: दुधात वेलची टाकून उकळायला ठेवावे. पाव भाग झाल्यावर गॅसवरून उतरून साखर मिसळावी व थंड करावे. थंड दुधात पिवळा रंग, मध, लिंबाचा रस, रंगीत खडीसाखर व मेवा टाकावा.
साच्यात भरून फ्रिजरमध्ये सेट करावे. ग्लासमध्ये सर्व्ह करताना कुटलेला बर्फ घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply