साहित्य:- २ वाट्या मैदा, १ वाटी रवा, साजूक तूप, २ वाट्या खवा, दीड वाटी पिठीसाखर, केशर-वेलची पूड, १ वाटी सुकामेवा पूड.
कृती:- मैदा, रवा, मीठ व अर्धा चमचा पिठीसाखर एकत्र करावी. त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घालून कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट कालवावे. 2 वाट्या खवा तांबूस परतून त्यात पिठीसाखर मिसळून छान मऊसर करून घ्यावा. त्यात वेलची पूड, केशर व काजू-बदामाची जाडसर पूड मिसळावी. रवा – मैदा तासभर भिजल्यावर पुन्हा चांगले मळून घ्यावे. लुक्मीी चौकोनी आकाराची असते. पुरीला घेतो तेवढीच लाटी घेऊन लांबट लाटावे. अर्ध्या भागात सारण भरून दुसरा अर्धा भाग त्यावर दाबून चौकोनी आकार द्यावा. नंतर लुक्मी साजूक तुपात तळून गरमागरम वाढाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply