मासवडी

साहित्य:
सारण: २ टेस्पून तीळ, १/४ कप सुकं खोबरं, २ टीस्पून खसखस (ऐच्छिक), ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून, १ मध्यम कांदा, १/२ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल तिखट, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग 2 स्पून काळा मसाला, २ टीस्पून तेल
चवीपुरते मीठ.
आवरणासाठी: १ कप बेसन, २ टेस्पून तेल, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग, १ टीस्पून टीस्पून जिरं, २ टीस्पून लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ.

कृती : १) सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले मी मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..
२) कढईत तेल गरम करून त्यात हिंग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ठेवावा कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.
३) सारण तयार झाले कि आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हळद, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात १ कप पाणी घालावे. पाण्यात मीठ घालावे पाण्याला उकळी आली कि त्यात बेसन घालून भरभर घोटावे. गुठळ्या होवू देउ नयेत. मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खावून पहावे. कच्चट लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे.
४) पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट त्रिकोण कराव. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.
कापून तसाच अगर Fry करून घ्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*