साहित्य:- मैदा २ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी लोणी, मीठ चवीनुसार, मध अर्धी वाटी, पिठीसाखर चार चमचे, पिस्ता वबदाम चार चमचे, साखर दोन वाट्या, तूप तळायला.
कृती:- मैद्यामध्ये मीठ घालून भिजवून घ्यावे. साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यावा. तांदळाच्या पिठात मैदा, लोणी मिसळून त्याचा साटा तयार करावे. मैद्याची लांब चौकोनी पोळी लाटून त्यावर साटा लावावे व ते बुकफोल्ड करावे. १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून परत ही प्रोसेस करावी. त्यानंतर याची चौकोनी पोळी लाटून त्याचे चौकोनी तुकडे करावे. चारही कोपरे मधोमध आणून दाबून टाकावे. मंद आचेवर तळून साखरेच्या पाकात बुडवून बाहेर काढावे. मधोमध बदामाचे काप लावून खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply