साहित्य : २-३ उकडलेले बटाटे,२५० ग्रॅम पनीर,चवीनुसार मीठ, २-३ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ,फिलिंगसाठी १०-१२ काजूचे तुकडे व १०-१२ बेदाणे,तळणीसाठी गरजेनुसार तेल.
ग्रेव्हिसाठी साहित्य : ६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२ काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.
कृती : कोफ्त्यासाठी एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, पनीर,चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लॉवर घ्या व त्यात थोडेसे तेल आणि जरूरी पुरते पाणी घालून कुस्करून व मळून घेऊन त्याचे पिठाचा घट्ट गोळा बनवा. मग त्या पिठातून छोटे लिंबाएव्हढे गोळे घेऊन त्यात काजूचे तुकडे व बेदाणे घालून छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्या व एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात ते कोफ्ते शॅलोफ्राय करा.
ग्रेव्हिसाठी काजूच्या पाकळ्या अर्धी वाटी दुधात अर्धा तास भिजत घालून ठेवा व नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजत घातलेल्या काजुच्या पाकळ्या,चिरलेले टोमॅटो,दूध,मकाणे व आल्याचा तुकडा घालून वाटून त्याची पेस्ट बनवा. आता एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्यात जिरे टाकून ते तदतडल्यावर मग त्यात टोमॅटो-काजूची पेस्ट घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या. परतून घेत असतांना काढाईला सगळीकडून तेल सुटायला लागले की त्यात लाल सुक्या मिरच्या,चवीनुसार मीठ,धने पूड व हळद घालून थोड्या वेळ परता आणि मग त्यात दही,फ्रेश क्रीम , थोडेसे पाणी व डाळ घाला आणि ५-७ मिनिटे शिजवा. नंतर त्यात टाळून ठेवलेले कोफ्ते घाला व २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. सर्व्हिंग बाउल्समध्ये मलई पनीर कोफता काढून घेऊन त्यावर फ्रेश क्रीम आणि चिरलेल्या कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply