साहित्य: बारीक मिरची १०,१२, काळे चणे (भिजवून वाटलेले) १/२ वाटी नारळाचे दूध २ वाटय़ा, धने १ वाटी, (काळी मिरी, लवंग, दालचिनी, दोडे, दगडफूल, हळद, शोप, जावित्री, बादलफूल, मोहरी, त्रिफळ, शहाजिरा) प्रत्येकी १ चमचा, कांदे ३०० ग्रॅम, आलंलसूण पेस्ट १/२ वाटी, खसखस वाटलेली दीड वाटी, सुके खोबरे १ वाटी, ओले खोबरे सवा वाटी, तीन उभे कापलेले कांदे, गरम मसाला १/२ चमचा.
कृती : वरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी. उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करून ठेवा. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यामध्ये ४ चमचे आलंलसूण पेस्ट छान परतून घ्या. नंतर यात १ वाटी मालवणी मसाला घालून थोडं पाणी घाला व चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply