मालपुआ

साहित्य: मालपुवाची धिरडी, १ कप मैदा, ३/४ कप खवा, २ टेस्पून रवा, १ चिमुटभर बेकिंग सोडा, दीड कप दुध (रूम टेम्प.), १ चिमटी मीठ, २ चिमटी बडीशेप, १/२ कप तूप, साखर पाक १ कप साखर, १ कप पाणी, १ टीस्पून वेलचीपूड
१ चिमटी केशर , सजावटीसाठी : २ टेस्पून पिस्ते, भरडसर चिरलेले, केशर.

कृती: एक मध्यम वाडगे घ्यावे. त्यात मैदा, रवा, खवा, दुध, आणि मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण एकदम स्मूथ व्हावे म्हणून मिक्सरमध्ये १०-१५ सेकंद फिरवावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यात बडीशेप घालून मिक्स करावे. मिश्रणाची कान्सीस्टन्सी इडलीच्या पिठाइतपत पातळ हवी. खूप घट्ट नको आणि एकदम पाणीसुद्धा नको.
साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर, केशर आणि पाणी एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावे. ५ ते ६ मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढावी. पाकात चमचा बुडवून लहान ठिपका एका प्लेटमध्ये टाकावा. हा ठिपका ४-५ सेकंदातच हाताळण्यायोग्य होईल. अंगठा आणि पहिले बोट यात पाक धरून उघडझाप करा. आणि एक तार आली तर पाक तयार झाला असे समजावे. जर तार आली नाही तर अजून २-३ मिनिटे उकळी काढावी. साखरेचा पाक तयार झाला कि एकदम मंद आचेवर हा पाक ठेवून द्यावा. गॅस बंद करू नये. पाक थोडा कोमट राहू द्यावा. पाक तयार झाला कि लगेच धिरडी घालायला घ्यावीत. मिश्रणात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे. एक लहान फ्रायिंग पॅन गरम करून त्यात १ टेस्पून तूप घालावे. तूप वितळले कि एक डावभर मिश्रण घालून पातळसर धिरडे घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर दोन्ही बाजूनी लालसर शेकून घ्यावे. तयार धिरडे गरम असतानाच पाकात घालावे. २ मिनिटे पाक मुरावायला ठेवावे. तयार मालपुवा प्लेटमध्ये काढून पिस्ता, केशर घालून लगेच सर्व्ह करा. अशाप्रकारे सर्व मालपुवे तयार करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*