साहित्य – चिकन – अर्धा किलो, कांदे – 6/7 (मोठ्या आकाराचे), सुके खोबरे – 1 कप (किसलेले ), टोमॅटो – 2 (मोठे व लालबुंद ), आलेलसुण पेस्ट – 2 मोठे चमचे, हळद – 2 चमचे, लाल मिर्च पाउडर – 3 चमचे, चिकन मसाला – 1 पॅकेट, काश्मिरी मिरची पावडर – 2 चमचे,गरम मसाला – 1 चमचा, धणे जिरे पूड पूड – 1 चमचा, कोथिंबीर- 1 वाटी
खड़ा मसाला : दालचिनी – 2 तुकडे, काळी मिरी – 2, लवंग – 2, तेल – 1 वाटी, मीठ – चवीनुसार.
कृती – प्रथम चिकन स्वच्छ करून धुवून घ्यावे. एका पातेल्यात 3 चमचे तेल गरम करून त्यात दोन मोठे कांदे पातळ उभे चिरून घालावे. कांदा गुलाबी झाला की त्यात खड़ा मसाला घालावा. 1 चमचा आले लसुण पेस्ट घालावी. चांगले परतून घ्यावे. कांदा छान भाजला गेला की त्यात एक चमचा हळद घालून परतावे. चमचाभर मीठ घालावे. सर्व एकत्र परतून त्यात चिकन घालावे. मग त्यावर झाकण ठेवुन 10 मिनिटे मंद आचेवर ठेवावे. दुसरीकडे एका भांड्यात 3 ते 4 ग्लास पाणी गरम करत ठेवावे. चिकन शिजवताना मीठ घातल्याने त्याला आपोआप पाणी सुटते. त्या पाण्यात चिकन छान शिजायला मदत होते व चव ही छान येते . आता चिकनमधील पाणी आटले असेल की दुसरीकडे गरम करत ठेवलेले 2 ग्लास पाणी चिकनमध्ये घालावे. आता चिकन छान शिजवून घ्यावे. (पाणी गरजेनुसार कमी जास्त घालू शकता. )
मसाल्याचे वाटण – 3 मोठे कांदे उभे पातळ कापून थोड्या तेलात परतून घ्यावे. त्यात 1 कप किसलेले खोबरे ही थोड्या तेलात भाजून घालावे. दोन्ही थंड होऊ द्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदा, खोबरे, 2 चमचे आलेलसुण पेस्ट, पाव वाटी कोथिंबीर थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. वाटण तयार झालेले असेल. (आले लसुण पेस्ट नसल्यास 7/8 पाकळ्या लसुण व एक छोटा तुकडा आले (साधारणतः अर्धा इंच) वापरावे. )
कढाई मध्ये तेल गरम करून त्यात 3 मोठे कांदे उभे पातळ चिरून घालावे. चांगले फ्राय झाले की त्यात आले लसुण पेस्ट घालावी. चांगले परतले की त्यात वाटलेला मसाला घालून परतावे. 3 ते 4 मिनिटे परतले की मग हळद घालावी. नंतर लाल मिर्च पाउडर, गरम मसाला, चिकन मसाला, धणे जिरे पूड घालून परतून घ्यावे. त्यात टोमॅटो घालून परतून घ्यावे. मग चिकन शिजलेल्या स्टॉकचे पाणी 2 चमचे/पळ्या घालून परतावे म्हणजे मसाला जळत नाही. झाकण ठेवून 2 मिनिट ठेवावे. मिश्रणाला छान तेल सुटू लागते.
आता त्यात चिकनचे तुकडे घालावे व छान हलवून घ्या.त्यात चिकन चा स्टॉक ही गरजेनुसार घालावा. झाकून 5 मिनिट ठेवावे. नंतर झाकण काढून हलवून चवीनुसार मीठ घालून पुन्हा मंद आचेवर 10 मिनिटे ठेवावे. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. भाकरी /पोळी/पराठा सोबत वाढावे.
Leave a Reply