साहित्य: पाउण कप बासमती/ साधा तांदूळ
वाटण : २ टिस्पून धणे, २ टिस्पून जिरे, १/२ कप कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लाल सुक्या मिरच्या हे सर्व मिक्सरवर वाटून घ्यावे.
६-७ काजू बी
दिड टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
१ टिस्पून साखर
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मीठ
२ टिस्पून तेल
१/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हळद
तांदूळाच्या अडीचपट पाणी
कृती: तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे.
नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे.
तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे. बारीक गॅसवर उकळी काढावी.
उकळी आल्यावर तयार केलेले वाटण, गोडा मसाला, चवीपुरते मीठ, साखर, गूळ घालावा. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ काढावी.
खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply