साहित्य : 1 कप बासमती तांदूळ, 1 कप स्वीट कॉर्न, 2क्क् ग्रॅम मशरूम, 2 बारीक चिरलेले पांढरे कांदे, 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 12-15 कळ्या बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा काळे मीरे पूड, 2 किसलेले चीज क्युब, 4 चमचे बटर किंवा ऑलीव्ह ऑईल, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा ऑरेगेनो आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम तांदूळ धुवून पाण्यात अर्धा तास भिजवावे. मशरुम्स धुवून चार तुकडय़ांमधे कापून घ्यावेत. एका पॅनमधे तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, मिरची, कांदा टाकून ते दोन तीन मिनिटं परतवावे. नंतर त्यात मीरेपूड, ऑरेगेनो, मशरुम आणि कॉर्न टाकून परतावं. तांदूळ व चवीनुसार मीठ टाकून एक मिनिट तेही परतून घ्यावं. त्यात 2 कप गरम पाणी टाकावं. उकळी आल्यावर झाकण ठेवून गॅस कमी करून पुलाव शिजू द्यावा.
शिजल्यावर झाकण काढून किसलेलं चीज टाकावं. परत दोन मिनिटं झाकून ठेवून वाफ काढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply