साहित्य : ३५० ग्रॅम मटारचे दाणे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग,, १ चमचा मीठ, अर्धा चमचा ताजी मिरपूड, २ चमचे चाट मसाला, अर्धा चमचा वाळलेल्या पुदिन्याची पूड, ४ चमचे चिरलेली कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, ८-१० भेळेच्या किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या किंवा खारे शंकरपाळे, १ वाटी दही ( जास्त चालेल), ४ चमचे तेल
कृती : मिरच्या उभ्या चिराव्या. पातेल्यात तेल तापवावे. त्यावर जिरे व मिरच्या घालून धुतलेले मटारदाणे फोडणीस टाकावेत. अर्धी वाटी गरम पाणी घालून वर पाण्याचे झाकण ठेवावे. उकळी आल्यावर आंच मंद ठेवावी. सुमारे २०-२५ मिनिटांनंतर मटार शिजतील त्यात मीठ व जरून वाटल्यास झाकणीवरचे गरम पाणी घालावे. खाली उतरवुन मिरपूड, पुदिनापूड व चाट मसाला घालून ढवळावे. गार झाल्यानंतर वाढावच्या भांड्यात काढून ठेवावे. दह्यात पाणी व घालता नुसतेच घुसळावे किंवा चमच्याने फेसावे. हे दही भाजीवर घालावे. कोथिंबीर वरून शिवरावी. खायला देताना पुऱ्या कुस्करून वरून घालाव्या व द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply