साहित्य : दोन वाट्या मटारचे मऊ उकडलेले दाणे, १ कांदा, ओले खोबरे पाव वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा प्रत्येकी, पाव चमचा धने व पाव चमचा जिरेपूड, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, दोन वाट्या मैदा वा १ वाटी कणीक व १ वाटी मैदा, एक डाव तेल गरम करून (मोहन) मीठ, तळणीसाठी तेल, हळद, लाल तिखट, मीठ.
कृती : प्रथम एक चमचा तेलावर आले लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. थोडी हळद हिंग घालून परता. धने जिरे पूड, बारीक चिरलेला कांदा, घालून ५ ते ७ मिनिटे छान परतून घ्या. उकडलेले मटारचे दाणे रवीने बारीक करून घ्या व त्यात घाला. मीठ घालून नीट परतून घ्या. सारण थोडे कोरडे करून घ्या. मैदा व कणीक सम प्रमाणात घेऊन त्यात मीठ, हिंग, हळद किंचित ओवा पूड घाला व ती कणीक नीट मळून घ्या., त्या पिठाच्या छोट्या पुऱ्या करा व त्यात वरील सारण घाला व करंजीच्या आकार द्या व गरम तेलात खरपूस तळून घ्या. तळताना गॅस मध्यम आंचेवर ठेवा. गरम गरम करंज्या टोमॅटो सॉसबरोहबर सर्व्ह करा. वरील सारणात फ्लॉवर अगदी बारीक करून घातला तरी खूप छान लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply