साहित्य – २ वाट्या मटार (उकळलेल्या पाण्यात घालून मऊ झालेला), पाव वाटी वा १२५ ग्रॅम पनीरचे लांबट वा चौकोनी तुकडे, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो, एक चमचा लसूण व अर्धा चमचा आले पेस्ट हे सर्व तव्यावर १ चमचा तेलावर परतून, गार करून पेस्ट करून घ्या. मीठ, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, पाणी.
कृती – प्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यावर कांदा टोमॅटोची तयार पेस्ट परतून घ्या. ५ मिनिटे परतल्यावर शिजवलेला मटार, मीठ गरम मसाला घालून उकळा व पनीरचे हव्या त्या आकाराचे तुकडे घाला व २ मिनिटे भाजी गरम करून सर्व्ह करा. ही भाजी दाट ग्रेव्हीचीच छान लागते. त्यामुळे अगदी कमी पाणी घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply