साहित्य:- दोन वाट्या ताजे मटार, तीन ते चार ओल्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी – जास्त घ्या) कोथिंबीर, 1 चमचा आले पेस्ट, साखर, लिंबू, मीठ, तेल, 1 वाटी कणीक व 1 वाटी मैदा, मीठ व तेल घालून भिजवून घेणे. तेल व तांदूळाची पिठी.
कृती : प्रथम तेलावर जिरे – हिंग – आले पेस्ट घालून परतून घ्या. त्यात कोथिंबीर व शिजवून मऊ केलेले मटार घाला व परता. मीठ -लिंबू -साखर घाला. नंतर गार झाल्यावर वरील मिश्रण मिक्स रमधून बारीक करून नीट सारखे करून घ्या. भिजलेल्या कणकेच्या गोळ्यात वरील सारण घालून छोट्या फुलक्या प्रमाणे लाटून घ्यावी. तव्यावर तेल सोडून मटार – पराठे करून घ्यावेत. हे छोटे – छोटे पराठे दही व लोणच्याबरोबर सर्व्ह करावेत. मध्य प्रदेशात या पराठ्यांना मटार कचोरी म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply