साहित्य:- ४ ते ५ उकडलेले बटाटे, २ वाट्या उकडलेले मटारचे दाणे, १ कांदा बारीक चिरून, धने – जिरे पूड १ चमचा प्रत्येकी तेल, ४-५ ओल्या मिरच्या, आले, जिरे, पेस्ट, ४-५ ब्रेडचे स्लाइस, मीठ.
कृती:- प्रथम बटाटे मऊ उकडून घ्यावेत. नीट बारीक कुस्करून त्यात मीठ व 2-3 स्लाइस बारीक कुस्करून घालावेत. मऊ वाटल्यास अजून स्लाइस घालून गोळा करून ठेवावा. तेलावर मटारचे उकडलेले दाणे, बारीक कांदा, आलं-मिरची पेस्ट, मीठ- धने-जिरे पूड घालावी. साखर व लिंबू पिळावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी व 3-5 मि. परतून छान सारण करून घ्यावे.
हाताला किंचित तेलाचा हात लावून बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घ्या त्याची पातळ पुरी करून त्यात 1 ते दीड चमचा सारण घालून पारी बंद करा व गोल व चपटा पेढ्यासारखा आकार द्या व तव्यावर तेल सोडून हे पॅटीस खरपूस भाजून घ्या (बटाटा चिकटू नये म्हणून बारीक रवा वा ब्रेडक्रम्समध्ये हे पॅटीस घोळवून मग ते तव्यावर परतून घ्या वा तेलात तळून घ्या.)
कोथिंबीर, मिरची व पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर व टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply