साहित्य – एक वाटी मटार, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, मिरच्या आले लसूण क्रश करून प्रत्येकी १ चमचा, फक्त आले पेस्ट अर्धा चमचा, धने, जिऱ्याची पूड प्रत्येकी एक चमचा, बडिशेप पूड पाव चमचा. लिंबू साखर, मीठ तळण्यासाठी तेल, एक ते दीड वाटी मैदा – मीठ व दोन मोठे चमचे तेल घालून कणकेप्रमाणे भिजवून घ्यावा.
कृती – प्रथम मटार उकडून व कुस्करून त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून घाला. तेल गरम असताना प्रथम आले लसूण मिरची पेस्ट व मग मटार व बटाटे घाला. नंतर मीठ, धने – जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला, बडिशेप पूड, साखर चिमूटभर व मीठ व लिंबू पिळून छान सारण करून घ्या.
नंतर भिजवलेल्या कणकेची लिंबाएवढी पोळी करून घ्या. त्याच्या तीन ते चार पट्ट्या काढा (सुरीने) प्रत्येक पट्टीवर त्रिकोणी खणप्रमाणे आकार द्या. सामोसाचा आकार द्या. त्यात सारण भरून सामोसा नीट बंद करून घ्या व कढईत तेल घालून त्यात सामोसे गुलाबी रंगावर तळून घ्या. चिंचेच्या आंबट-गोड चटणीबरोबर व हिरव्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करा. प्रयत्नाने सामोशाचा आकार छान येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply