साहित्य:- १ छोटी जुडी मेथीची भाजी, ५-६ लसूण पाकळ्या, २-३ सुक्या लाल मिरची, २ वाटी पाणी, २ वाटी कणिक
हळद, चवीपुरते मीठ.
कृती:- दिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून पाण्याने थोडी घट्ट भिजवावी.
१०-१५ मिनिटे कणिक भिजल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे करावेत. एक-एक गोळा घेऊन बोटांना थोडा तेलाचा हात लावून दिव्यांचा आकार देऊन एका ताटात ठेवावे. मेथीची भाजी पाण्याने धुऊन, साफ करून बारीक कापून घ्यावी. नंतर एका भांडय़ात तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसूण आणि लाल मिरचीची फोडणी करावी. त्यामध्ये कापलेली मेथी, मीठ आणि पाणी घालून वाफ आणावी. भाजीला वाफ आल्यावर त्यामध्ये एक एक दिवे सोडावेत. १० मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे. रात्रीच्या जेवणाला एखाद दिवस पोळ्यांऐवजी भाजीतले दिवे करू शकतात. करण्यास वेळही कमी लागतो आणि पचण्यास तसे हलके असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply