साहित्य:
१ कप मिल्क पावडर, १/२ कप कंडेन्स मिल्क, २ टीस्पून साजूक तूप, १/२ टीस्पून वेलची पूड.
कृती: मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क आणि तूप एकत्र एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावे. ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर काढून मिनिटभर ढवळावे. नंतर १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे.
भांडे बाहेर काढावे. मिनिटभर ढवळावे. परत ३०-३० सेकंद २ वेळा मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येक वेळी भांडे बाहेर काढून ढवळावे. मिश्रण घट्टसर झाले पाहिजे. जर अजून मिश्रण घट्ट झाले नसेल तर ३० सेकंद अजून मायक्रोवेव्ह करावे.
वेलचीपूड घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे गार होवू द्यावे. एकदा मिश्रण हाताळण्यायोग्य झाले कि पेढे बनवा.
टीपा: हे पेढे सुरुवातीला थोडे चिवट होतात. दुसऱ्या दिवशी खुटखुटीत होतात. वाटल्यास वरील प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेउन ट्राय करून पहावे. खवा नसल्यास मिल्क पावडरचे पेढे हा चांगला पर्याय आहे. यामध्ये आवडीनुसार बटरस्कॉच, वेनिला, केशर यांचे इसेंस घालू शकतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून त्याऐवजी १/२ कप काजू पावडर, किंवा १/२ कप बदाम पावडर घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply