साहित्य: १/२ कप पुदीना पाने, १/२ कप कोथिंबीर, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, २ लसूण पाकळ्या (ऐच्छिक), २ हिरव्या मिरच्या, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून लिंबाचा रस, चवीपुरते मिठ, १/४ टिस्पून साखर.
हि चविष्ट चटणी व्हेज. सॅंडविच, मटार खस्ता कचोरी, सोया कटलेट्स, मेथीच्या देठाची भजी, ब्रेड रोल, मटार बटाटा करंजी, पट्टी समोसा, ढोकळा आणि इतर मधल्या वेळच्या पदार्थांसोबत छानच लागते.
कृती: सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास २ ते ३ टेस्पून पाणी घालून वाटून घ्यावे.
Leave a Reply