साहित्य – गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, धानलाह्या, मूग डाळ, मसूर डाळ, मटकी, हरभरा डाळ, हिरवे वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खोबर्यावचे काप, तेल, मीठ, लाल तिखट, हळद, सायट्रिक अँसिड, साखर, गरम मसाला, हिंग, खसखस, कढीपत्ता आणि मोहरी.
कृती – एक-एक वाटी तिन्ही प्रकारच्या लाह्या, इतर धान्य अर्धी अर्धी वाटी किंवा आपल्या आवडीप्रमाणे घेऊन भिजत घालावी, ८-१0 तासांनी पाण्यातून काढून कापडावर घालून कोरडे करावे, कढईत तेल तापवून डाळी आणि धान्यं तळून घ्यावी तसेच शेंगदाणे, काजू तळावे. तळलेले जिन्नस आणि लाह्या एकत्र करावे. एक वाटीभर तेल तापवून त्यात कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, खसखस घालून जरा परतावं. त्यात वरील मिश्रण घालून मीठ, लाल तिखट, गरम मसाला, खोबर्या चे काप आणि बेदाणे घालून सर्व जिन्नस खाली-वर करावं. सायट्रिक अँसिड आणि साखर बारीक करून सर्वात शेवटी टाकावी. गॅस बंद करून सर्व जिन्नस चांगलं एकत्र करावं. हा चिवडा व्यवस्थित गार झाल्यावर डब्यात भरावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply