साहित्य:- १ पेला आंब्याचा रस, ३ पेले फळांचा रस (डाळिंब, मोसंबी, अननस), अर्धा पेला चिरलेली फळे व क्रीम, अर्धा लिटर दूध, १ पेला कुरकुरीत नूडल्स, अर्धा मोठा चमचा साखर, अर्धा चमचा गुलाबपाणी, तीन-चार हिरव्या वेलच्या, १ चमचा मध.
कृती: दूध उकळावे व त्यात वेलची पूड टाकावी. आटवून पाव भाग राहिल्यावर थंड व्हायला ठेवावे.
आमरस, मिश्र फळांचा रस व क्रीम व्यवस्थित मिसळावे. कुल्फीच्या साच्यात मिश्रण भरून कुल्फी तयार व्हायला ठेवावी. खायला देताना डिशमध्ये आधी रबडी मग कुल्फी ठेवावी.
गुलाबपाणी व मधात कुरकुरीत तळलेले नूडल्स टाकावे आणि घोळवून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply