मोड आलेली मेथी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. विशेषतः मधुमेहाच्या आजारात, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ही मेथी उपयुक्त ठरू शकते. वजनाची चिंता असणाऱ्यांना मोड आलेल्या मेथीचे पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. आपल्या वाढणाऱ्या वजनाची, ब्लडशुगर आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागली असेल तर यावर एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे मेथी. मेथीचे लाडू बाळंतिणीला देतात. अनेक आजारांमध्येही मेथी फायदेशीर ठरते; पण मेथीचे लाडू कडू लागतात, म्हणून सगळे खायला काचकूच करतात. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली, तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचेही पुष्कळ फायदे आहेत. वजन कमी करण्यास मदत होते, मधुमेह नियंत्रणात राहतो, कोलेस्टेरॉल कमी होते, पचनास मदत होते, छातीतील जळजळ कमी होते, काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयुक्त, बाळंतिणीचे दूध वाढते, महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राखते, भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर, सौंदर्य प्रसाधन म्हणूनही वापरले जाते, केसांच्या समस्येवर उपयुक्त.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मोड आलेल्या मेथीचे काही पदार्थ
डाळ मेथी
मोड आलेली मेथी व भाज्यांचे सूप
मोड आलेल्या मेथीची खिचडी
मोड आलेल्या मेथीचा पुलाव
मूगडाळ मेथी
मोड आलेल्या मेथीची उसळ
पंचभेळी भाजी
मोड आलेल्या मेथीची पचडी
मोड आलेल्या मेथीचे सॅलड
मोड आलेल्या मेथीचे थालीपीठ
Leave a Reply