साहित्य: मेथीदाणे १ छोटी वाटी, बासमती तांदूळ २ वाट्या(अंदाजे) हळद, तिखट, मीठ, साखर,लिंबाचा रस, गरम मसाला पावडर, तेल, हिंग, मोहरी, थोडे साजूक तूप, ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ कांदे बारीक चिरून
कृती: सकाळी मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवावे. रात्री ते पाण्यातून काढून २-३ वेळा धुवावे म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा जातो.नंतर मेथी स्वच्छ फडक्यात बांधून ठेवावी. मोड यायला कधी कधी दोन दिवसही लागतात. अशी मोड आलेली मेथी वाटीने मोजून घ्यावी व त्याच्या दुप्पट तांदूळ घेऊन धुवून घ्यावेत. तेलावर हिंग मोहोरी फोडणीस टाकून कांदा तेलावर परतून घ्यावा. कांदा जास्त असला की पुलाव चांगला लागतो. त्यावर मेथी व तांदूळ घालून हळद,तिखट,मीठ,गरम मसाला पावडर घालून छान शिजवावा. भात होत आला की त्यात थोडी साखर व लिंबाचा रस घालून ढवळावा. थोडे साजूक तूप घालून पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी. सर्व्ह करतांना खोबरे व कोथिंबीर घालून सजवून वाढावा, डायबेटीस असणार्यांहनी हा जरूर खावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply