मुगडाळीचे पराठे

साहित्य -: हिरवी मुग दाळ दोन वाट्या, दोन तासापूर्वी भिजत घालावी, अद्रक लसुन ची पेष्ट, हिंग, जिरे, हिरवी मिरची ५ ते ७, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, गव्हाचे पीठ तीन वाटया.

कृती -: भिजवलेल्या डाळीची साल काढून घ्यावी, कुकर मध्ये ती दोन शिटी होईस्तोवर शिजवावी, नंतर मिक्सर मध्ये हिंग, अद्रक, लसून, मिरची, एकत्रित करून थोडेबारीक करून घ्यावे , मीठ घालावे, नंतर गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकून एकत्रित करून गोळा भिजवावा. नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. व तव्यावर तेल टाकून भाजावे. मुग दाळ पराठे तयार झाले कि लोणचे किंवा दह्या सोबत खाण्यास दयावे.

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*