साहित्य:- २ कप दही, १ टोबलस्पून, अर्धा टीस्पून मेथी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, एक चिमूट हळद, एक लहान कांदा चिरलेला, ३ लाल मिरच्या वाटून, १ टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता.
कृती:- एका भांडय़ात तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घाला. दोन मिनिटं तसंच ठेवा. मग त्यात चिरलेला कांदा आणि बारीक केलेली मिरची घाला. थोडा वेळ परता. मग मेथी, जिऱ्याची पावडर घाला. मंद आचेवर ठेवा. त्यात फेटलेलं दही घाला. ढवळत राहा. उकळी येऊ देऊ नका. त्याच्या आधीच वाफ आल्यावर गॅस बंद करा. त्यात मीठ घाला. भात भाकरी, चपाती थालीपीठाबरोबर चविष्ट लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply