साहित्य:-
चण्याची डाळ, दोन ते तीन लवंगा, एक तुकडा दालचिनी, एक मसाला वेलदोडा, तीन हिरव्या मिरच्या, मीठ, चिरलेला पालक किंवा मेथी, आले-लसूण पेस्ट, तेल.
कृती:-
चण्याची डाळ पुरणासाठी शिजवतात तशी शिजवून घ्या. शिजवताना त्यात सर्व मसाला घाला. शिजल्यानंतर मसाला काढून टाका. त्यात चिरलेला पालक किंवा मेथी घाला व पुन्हा शिजवा. कोरडे झाल्यावर वाटून घ्या. त्यात मीठ, आले-लसूण पेस्ट घाला. तयार सारण कणकेच्या पारीमध्ये भरून पराठे लाटून घ्या व तेलावर भाजून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply