साहित्य: २ ताजे किसलेले मुळे, १/२ चमचे लाल मिरची, १/२ चमचे वाटलेले अनारदाने, १ कांदा बारीक कापलेला, १ कापलेली हिरवी मिरची, १ जुडी कापलेली कोथिंबीर, १ कप तूप तळणासाठी, २५० ग्रा. गव्हाचे पीठ, १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी,मीठ चवीनुसार.
साहित्य: पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे. मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे. दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.
Leave a Reply