साहित्य:- ४ वाटय़ा तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, २५ ग्रॅम पांढरे तीळ, २५ ग्रॅम जिरं, २ टेबलस्पून हिंग, १०० ग्रॅम लोणी, मीठ चवीप्रमाणे, तळणीसाठी तेल.
कृती:- तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. वाळवून घ्या. ते नीट वाळले की दळून घ्या. उडीद डाळ भाजून घ्या आणि मग दळून घ्या. तांदूळ, उडीद डाळ यांचं पीठ नीट मिसळून घ्या. त्यात तीळ, जिरं, हिंग, लोणी आणि मीठ घाला. पाणी घालू नका. त्यातलं थोडं मिश्रण घ्या. त्यात पाणी घाला. गोळा करून घ्या. या गोळ्याला हातानेच चकलीसारखा आकार द्या. कढईत तेल तापवा. तापलेल्या तेलात मुरुक्कू टाका. तळून घ्या. मुरुक्कू तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply