साहित्य:-१/२ कप नाचणीचे पीठ, १ कप सोयाबीनचे पीठ, १/२ कप तूप (थोडे जास्त लागू शकते) ,१/४ कप जाड पोहे , १/४ कप डिंक , १/४ कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून), १/२ टिस्पून वेलची पावडर, ३/४ कप गूळ (बारीक किसलेला किंवा चिरलेला).
कृती:- कढईत तूप वितळवून घ्यावे. त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्यावे. एका ताटलीत काढून ठेवावे आणि थोडे चुरून घ्यावे एका ट्रेला तूप लावून तयार ठेवावा.
त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि कणिक मंद आचेवर भाजावी. पीठं अगदी कोरडी भाजू नयेत. तूप घालून सुद्धा पीठं कोरडी दिसत असतील तर तूप घालावे. पीठं भाजल्याचा छान वास आला की मिश्रण ताटलीत काढून ठेवावे. किसलेला गूळ आणि २-३ टेस्पून पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा. ही कृती करताना सतत ढवळत राहावे. गूळ पूर्णतः वितळला कि आच मोठी करून एक उकळी येउ द्यावी. आणि लगेच आच बंद करावी. त्यात भाजलेली पीठे, डिंक, पोहे, भाजलेलं खोबरं, आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. १ सेंमीचा थर बनवावा. कालथ्याने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. थंड झाले कि वड्या मोकळ्या कराव्यात.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply