साहित्य :३ वाट्या मैदा१ वाटी बारीक रवाअर्धी वाटी तेलअर्धा चमचा मीठ१ वाटी आंबट ताक२ वाट्या साखर२ लिंबाचा रसथोडेसे केशर व केशरी रंगतळण्यासाठी तूप.
कृती : रवा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व मीठ घालून कालवा. नंतर १ वाटी ताक घालून पीठ भिजवा. जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी वापरा. पुऱ्यासाठी पीठ भिजवतो तसे घट्ट पीठ भिजवा.साखरेचा एकतारी पाक करा. त्याट लिंबाचा रस, केशार व केशरी रंग घाला. वरील पिठाच्या जरा लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात. तुपात तळव्या व लगेचच पाकात ताकाव्या. पाक गरम असावा.दुसरा घाणा झाला झाला की पहिल्या पुऱ्या पाकातून काढून ताटात ठेवाव्या. पाक फार घट्ट झाल्यासारखे वाटल्यास त्यात थोडे थोडे पाणी घालून उकळून घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply