साहित्य : अर्धी वाटी मोड आलेली मेथी, 2-2 वाट्या निवडलेल्या वालपापडी व चवळीच्या शेंगा, रताळे, सुरण आणि बटाट्याचे प्रत्येकी दीड वाटी तुकडे, 4-5 पाच लहान वांगी (मध्ये चिरा देऊन), हळद, तिखट, मीठ, 4-5 लवंगा, दालचिनीच्या दोन काड्या, धने-जिरेपूड प्रत्येकी एक चमचा, लिंबाचा रस, तेल.
कृती : तेलाची फोडणी करून त्यात लवंग, दालचिनी, धने-जिरेपूड, गरम मसाला व मोड आलेली मेथी घालावी. त्यात हळद, तिखट घालून परतावे. नंतर चिरलेले सुरण घालून पुन्हा थोडे परतावे. सुरण थोडे शिजले, की इतर भाज्या घालाव्यात. चवीप्रमाणे मीठ व लिंबाचा रस घालावा. या भाजीत साखर, गूळ आणि पाणी घालू नये. ही भाजी तेलावर व वाफेवरच शिजवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply