साहित्य:- १२ ते १५पाणीपुरीच्या चपट्या पुऱ्या, उकडलेले बटाटे, 1 मध्यम कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, आवडीप्रमाणे चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस, घरात उपलब्ध असलेला चिवडा, फरसाण, उसळ इ. पाव वाटी.
कृती:- बटाटे उकडून, सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. आता एका डिशमध्ये घरात उपलब्ध असलेला एखादा चिवडा- फरसाण, उसळ घालावी. त्यावर सर्व पापडी (चपट्या पुऱ्या) नीट गोलाकार मांडून त्यावर बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोच्या फोडी, कोथिंबीर पसरावी. सगळ्यात वर चिंचेची चटणी अथवा सॉस पसरून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply