साहित्य :-
१) तीन वाटया तांदूळ
२) एक वाटी उडीद डाळ
३) पाऊण वाटी तूरडाळ
४) मुठभर पोहे , तेल
५) दोन ते तीन चमचे आंबट दही
६) चवीपुरते मीठ .
कृती :-
१) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
२) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .
३) पीठ आंबल्यानंतर तवा गैसवर ठेऊन चांगला तापवावा . त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा .
४) नंतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे . थोडया वेळाने डोसा आपोआप सुटून येईल .
५) त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा .
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply