पनीर पुदिना पराठा
पराठ्याचे साहित्य:- दोन कप कणीक, साडेतीन चमचे पातळ तूप, एक चमचा मीठ, मूठभर बारीक रवा, थोडे कोमट पाणी.
सारणाचे साहित्य:- पाव किलो पनीर हाताने मोडून, अडीच चमचे ताजा पुदिना चिरून, तीन हिरव्या मिरच्या चिरून, मीठ, मिरेपूड, एक चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून पेस्ट, कोथिंबीर व आले बारीक किसून.
कृती:- पराठ्याचे साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या. एका पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात आले, मिरेपूड, पनीर, मीठ व कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला. गार झाल्यावर पुदिना व कोथिंबीर चिरून घाला. हे सारण पराठ्यात भरून पराठे लाटून घ्या. तेल सोडून चांगले खरपूस भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आचारी पराठा
साहित्य:- बेसन, तूप, मोहरी, कलौंजी, मेथी, बडीशेप व जिरे प्रत्येकी पाव चमचा, तिखट, मीठ, आमचूर पावडर, पनीर आवडीप्रमाणे.
कृती:- पराठ्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पीठ मळून घ्या. सारणासाठी तुपात बेसन भाजून घ्या. मग मोहरी, कलौंजी, बडीशेप, जिरे व मेथी भाजून, कुटून घ्या. बेसनामध्ये आमचूर पावडर, तिखट, मीठ व वाटलेला मसाला घालून एकत्र करा. आवडत असल्यास पनीर किसून घाला. हे सारण भरून पराठा लाटून घ्या व भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मोगलाई पराठा
साहित्य:- चण्याची डाळ, दोन ते तीन लवंगा, एक तुकडा दालचिनी, एक मसाला वेलदोडा, तीन हिरव्या मिरच्या, मीठ, चिरलेला पालक किंवा मेथी, आले-लसूण पेस्ट, तेल.
कृती:- चण्याची डाळ पुरणासाठी शिजवतात तशी शिजवून घ्या. शिजवताना त्यात सर्व मसाला घाला. शिजल्यानंतर मसाला काढून टाका. त्यात चिरलेला पालक किंवा मेथी घाला व पुन्हा शिजवा. कोरडे झाल्यावर वाटून घ्या. त्यात मीठ, आले-लसूण पेस्ट घाला. तयार सारण कणकेच्या पारीमध्ये भरून पराठे लाटून घ्या व तेलावर भाजून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply