इटालियन पास्ताची प्लेट बघितल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटतेच ना? मग बघूया घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते.
साहित्य :
मॅक्रोनीज, गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा, टोमॅटो प्युरी, पिझ्झा पास्ता सॉस, मोझ्झरेल्ला चिझ, ब्लॅक ऑलिव्ह्स, मीठ.
कृती :
प्रथम एका भांड्यात गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा हे २ चमचे तेलावर मंद आचेवर परतून घेणे. चवीनुसार मीठ घालणे.
एका पातेल्यामध्ये मॅक्रोनीज उकळवून घेणे. शिजल्यानंतर त्या बाजूला पाणी निथळवण्यासाठी ठेवून देणे.
नंतर दुसर्या कढई मध्ये २ चमचे टोमॅटो प्युरी, पिझ्झा पास्ता सॉस (तुम्हाला हवा असल्यास), चिली फ्लेक्स, ओरिगानो, मोझ्झरेल्ला चिझ आणि चवीनुसार मीठ घालून सॉस बनवून घेणे.
त्या नंतर तयार केलेली भाजी, मॅक्रोनीज आणि रेड पास्ता सॉस एकत्र करुन त्यावर मोझ्झरेल्ला चिझ किसून आणि ब्लॅक ऑलिव्ह्स घालून पदार्थाचा आस्वाद घ्यावा.
Leave a Reply