साहित्य :
१ कप बेसन२ कप पाणी१/४ कप सुके खोबरे, किसलेले३-४ लसूण पाकळ्या, बारीक केलेल्या १ चमचा खसखस लाल तिखटमीठ, चवीनुसार ४ चमचे तेलजिरे, मोहरी,कढीपत्ता
कृती :
प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यामध्ये जिरे ,मोहरी ,हळद ,खसखस आणि कढीपत्ता घालुन १-२ मिनिटे परतून घ्या. नंतर आहे त्यातील अर्धे खोबरे वरील मसाल्यात घालून थोडेसे परतून घ्यावे. खोबरे जळणार नाही इकडे लक्ष असू द्या.
आता वरील मिश्रणात पाणी टाकून ते उकळी आणावी. त्यात मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालावी.
gas बारीक करून त्यामध्ये बेसन टाकून सतत हलवत राहावे. म्हणजे बेसनात गुठळ्या होत नाहीत.
तयार मिश्रण जाडसर आणि सुके असावे, पातळ असू नये.
जर तयार मिश्रण पातळ झाल्यासारखे वाटत असेल तर त्यात आणखी बेसन घालावे. भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे.
बेसन शिजल्यानंतर २-३ चमचे तेल त्यामध्ये घालून चांगले एकजीव करावे.
एका ताटाला तेलाचा हात लावून त्यावर कोथिंबीर आणि सुके खोबरे पसरावे.
त्यावरती तयार बेसनाचे मिश्रण पसरून चमच्याने ते बेसन नीट थापावे.
त्यावर परत थोडी कोथिंबीर आणि सुके खोबरे घालून चौकोनी आकाराच्या वड्या कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply